ग्रामीण प्रतिनिधी राळेगाव
राळेगाव येथील बचपन कॉन्व्हेंटमध्ये दररोज डोंगरखर्डा, झाडकीन्ही येथील १२ ते १५ विद्यार्थी घेऊन जाण्याकरिता ये-जा करीत असते. आज मंगळवारला त्या एमएच २९ एडब्ल्यू ०९२ क्रमांकाच्या बसमध्ये अंदाजे १२ विद्यार्थी प्रवास करीत असताना, वाहकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस पलटी होवून राळेगाव-डोंगरखर्डा रोडवर दुपारी ४ वाजताच्या सुमारास अपघात घडला.
अपघातानंतर वाहनातील विद्यार्थी एकावर एक पडले व खाली दबलेल्या चार ते पाच विद्यार्थी जबर जखमी झाले व त्यांना उपचाराकरीता नेण्यात आले व इतर मुले सुध्दा जखमी झाले. त्यामुळे ग्रामीण भागातील पालकांमध्ये स्कूल बस विषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले व अशा कॉन्व्हेंटच्या स्कूल बस वरती कार्यवाही होणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.





Social Plugin