Ticker

6/recent/ticker-posts

गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी



 महाराष्ट्र ग्रामीण न्यूज | प्रतिनिधी : विजय अधिकार, जव्हार

जव्हार शहरामध्ये पवित्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. विविध मंदिरे, श्री स्वामी समर्थ मठामध्ये आश्रम तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये गुरुंचे पूजन करून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

यावेळी भाविकांनी गुरुंच्या चरणी पुष्प अर्पण करून आशीर्वाद घेतला. अनेक ठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचन तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा सत्कार करून गुरूंप्रती आदर व्यक्त केला.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने समाजात ज्ञान, संस्कार आणि सदाचाराचा संदेश देण्यात आला. जव्हार शहर व  मोठ्या संख्येने या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला गुरुपौर्णिमा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी केली