Ticker

6/recent/ticker-posts

अनुसूचित जातीच्या विरोधात बुलढाणा येथे जिल्हास्तरीय महामोर्चा


 

समस्त आंबेडकर समाज व अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती बुलढाणा यांच्यातर्फे अहवान करण्यात येत आहे 

महाराष्ट्र ग्रामीण प्रतिनिधी महेंद्र खरात दि 29. 07,2026

अनुसूचित जातीच्या समस्त बांधवांना अहवान करण्यात येत आहे की विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक संघर्षातून भारतीय संविधानामध्ये कलम 341 नुसार आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्वाचा अधिकार मिळाला आहे या अधिकारामुळे देशातील समस्त अनुसूचित जातीच्या हजारो वर्षांची गुलामी नष्ट केली आज वर्तमान अनुसूचित जातीचे उप उपवर्गीकरण करून जाती जातीमध्ये फूट पाडून आरक्षण संपवण्याचे व गैर असवैधानिक क्रिमिलेयर लावण्याचे षड यंत्र सुरू झाले आहे त्यामुळे आरक्षणाचा अधिकार कमकुवत होऊन आरक्षण संपुष्टात येणार आहे येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी व संविधानिक हक्क अधिकार वाचवण्यासाठी बुलढाणा जिल्हा स्तरीय महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे तरी या मोर्चात लाखोच्या संख्येने संपूर्ण परिवारासह उपस्थित राहून तन-मन-धनाने सहभागी व्हावे अशी विनंती समस्त आंबेडकर समाज व अनुसूचित जाती उप वर्गीकरण विरोधी संघर्ष समिती बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांनी तमाम आंबेडकरी अनुयायांना केले आहे प्रमुख मागण्या 1, महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण प्रक्रिया तात्काळ रद्द करावी 2, शासनाने नियुक्त केलेल्या माजी न्यायमूर्ती अनंत बंदर आयोगाचा अहवाल तात्काळ सार्वजनिक करून गैर संविधानिक एक सदस्य अनंत बंदर समिती रद्द करण्यात यावी 59 जाती पैकी 58 जातीचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे. 4. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती समाजाची जातींनी हाय सामाजिक शैक्षणिक आर्थिक स्थितीचा व्यापक संरक्षण करून त्यांचा अहवाल जाहीर करण्यात यावा तसेच त्या अहवालाच्या आधारे अनुसूचित जातीसाठी शासकीय निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्व अनुशेष Backlog  पदे तात्काळ भरण्यात यावी 5,, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वस्तीगृह कौशल्य विकास योजना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच उच्च शिक्षणाच्या सुविधा वाढवून त्यांचा सर्वांगीण विकासासाठी विशेष उपयोजना करण्यात याव्यात.   प्रमुख उपस्थिती. सर सेनानी आनंदराज आंबेडकर भीमरावजी आंबेडकर खासदार चंद्रकांत हांडोरे. मा खा जोगेंद्रनाथजी कवाडे आमदार राजकुमार बडोले  मा आ बबनरावजी घोलप आमदार सिद्धार्थ खरात. आणि 59 जातीच्या प्रतिनिधी सह संविधानिक आरक्षण वाचवण्यासाठी लाखोच्या संख्येने सहभागी व्हा आयोजक समस्त आंबेडकर युवा समाज अनुसूचित जाती उप वर्गीकरण विरोधी संघर्ष समिती बुलढाणा जिल्हा