बजाज जनरल इन्शुरन्सच्या वतीने पोस्टरचे अनावरण; तालुका समन्वयक योगेश मांन्टे यांचे शेतकऱ्यांना विमा भरण्याचे आवाहन
जिवन साळवे /किनगाव राजा प्रतिनिधी
सिंदखेडराजा : प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचावा आणि पीक विमाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीच्या वतीने सिंदखेडराजा व लोणार तालुक्यात प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या जनजागृती पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
यावेळी बजाज जनरल इन्शुरन्स पीक विमा कंपनीचे तालुका समन्वयक योगेश मांन्टे यांनी शेतकऱ्यांना वेळेत प्रधानमंत्री फसल विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, अवर्षण, गारपीट, पूर तसेच इतर नैसर्गिक संकटांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक संरक्षण मिळण्यासाठी पीक विमा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याने अंतिम मुदतीपूर्वी पीक विमा भरून शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा.
यावेळी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजनेची माहिती, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि योजनेचे फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कोणत्याही अडचणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी किंवा बजाज जनरल इन्शुरन्सच्या प्रतिनिधींशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
सिंदखेडराजा व लोणार तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा लाभ घेऊन आपल्या पिकांचे आर्थिक संरक्षण सुनिश्चित करावे, असे आवाहन तालुका समन्वयक योगेश मांन्टे यांनी केले.





Social Plugin