Ticker

6/recent/ticker-posts

अमळनेर येथील सखाराम महाराज संस्थान वाडीतील आगीबाबत प्राथमिक माहिती; शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज




प्रफुल्ल शिरसाठ (अमळनेर प्रतिनिधी)


अमळनेर येथील सखाराम महाराज संस्थान वाडी परिसरात बुधवारी रात्री लागलेल्या भीषण आगीबाबत प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, वाडी परिसरातील सीसीटीव्ही बॉक्सजवळ झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर काही वेळातच आगीने मोठे स्वरूप धारण केले. अग्निशमन दलाने आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले.


या घटनेत मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होत असली, तरी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे श्रींच्या कृपेने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याबाबत संस्थानचे गादी पुरुष प. पू. प्रसाद महाराज यांनीही भाविकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे, शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रशासन आणि संस्थानकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत माहितीलाच महत्त्व द्यावे, असे त्यांनी सांगितले. आगीच्या नेमक्या कारणाचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू असून अधिकृत अहवालाची प्रतीक्षा आहे.