Ticker

6/recent/ticker-posts

सामाजिक कार्यकर्ते गौरीनंदन कन्नाके यांच्या पाठपुराव्याला यश; अखेर DBT प्रकरणी प्रशासनाचे लेखी उत्तर



विद्यार्थ्यांचा निधी 'Fund Transfer Processed' असूनही खात्यात जमा नाही; तांत्रिक अडचणींचा प्रशासनाकडून उल्लेख, निधी तातडीने वितरित करण्याची मागणी कायम

स्वप्नील माकोडे 

प्रतिनिधी राळेगाव 

आदिवासी विद्यार्थ्यांच्या सन २०२५-२६ च्या डीबीटी योजनेतील प्रलंबित निधीसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे विद्यार्थांचे नेते गौरीनंदन खुशलराव कन्नाके यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अखेर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा प्रशासनाने लेखी उत्तर दिले आहे. या पत्रात अनेक विद्यार्थ्यांचा निधी "Fund Transfer Processed" झाल्याचे नमूद करताना, आधार मॅपिंग व बँक खात्याशी संबंधित तांत्रिक कारणांमुळे रक्कम जमा होण्यास अडथळे येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

यापूर्वी गौरीनंदन कन्नाके यांनी प्रकल्प कार्यालयावर निवेदन देत, पात्र विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने नव्हे तर तातडीने निधी वितरित करण्याची मागणी केली होती. तसेच निधी न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्यानंतर प्रशासनाने लेखी उत्तर देत उच्चस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे कळविले आहे.

मात्र, विद्यार्थ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष पैसे कधी जमा होणार? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. त्यामुळे केवळ पत्रव्यवहार न करता सर्व पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यात निधी तातडीने जमा करावा, अशी मागणी पुन्हा जोर धरत आहे.

गौरीनंदन कन्नाके यांनी सांगितले की, "लेखी उत्तर मिळणे हा पहिला टप्पा आहे; मात्र प्रत्येक पात्र विद्यार्थ्याच्या खात्यात निधी जमा होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील."

📌 ठळक मुद्दे

प्रशासनाकडून DBT प्रकरणी लेखी उत्तर.

अनेक विद्यार्थ्यांचा Fund Transfer Processed, तरीही रक्कम खात्यात नाही.

आधार मॅपिंग व तांत्रिक अडचणींचा प्रशासनाकडून उल्लेख.

गौरीनंदन कन्नाके यांच्या पाठपुराव्यानंतर प्रश्न पुन्हा ऐरणीवर.

विद्यार्थ्यांना तातडीने निधी देण्याची मागणी कायम.

आदनिर्य सर  आपण बातमी प्रसिद्ध केली होती दोन अगोदर या विषयावर आता लेखी उत्तर मिळाले बातमी कशी प्रसिद्ध करता येईल तर बघा पत्र पाठवतो तुम्हाला