Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षक मनिष काळे सर व कुणाल सरोदे सर यांची बदली रद्द करून त्यांना मूळ शाळेतच कार्यरत ठेवण्याबत विनंती अर्ज.



आमच्या गावातील जि.प. शाळा गुजरी येथे कार्यरत असणारे *श्री. मनिष काळे सर व श्री.कुणाल सरोदे सर यांची बदली दुसऱ्या गावी झालेली आहे. परंतु गावकरी व पालकांच्या दृष्टीने मनिष काळे सर हे अत्यंत कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत.

सर्व पालक व ग्रामस्थ त्यांना गुजरी शाळेतच ठेवण्याचा आग्रह धरत आहेत.त्यामुळे मा. साहेबांना नम्र विनंती आहे की,  श्री. मनिष काळे सर यांची व श्री. कुणाल सरोदे सर झालेली बदली रद्द करून जनभावनेचा व पालकांच्या मागणीचा विचार करून त्यांना जि.प. शाळा गुजरी येथेच कार्यरत ठेवण्याचा आदेश द्यावा.

गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही व गावात शांतता राहील.आपण सकारात्मक निर्णय घ्याल ही अपेक्षा.नोट - सद्या गुजरी जिल्हा परिषद शाळा येथे 1 शिक्षक आहेत . पिपरे सर ( गुजरी येथे वर्ग 1ते 7 वर्ग आहेत . )

 राळेगाव स्वप्नील माकोडे ग्रामीण प्रतिनिधी राळेगाव