Ticker

6/recent/ticker-posts

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सावखेडा येथे विशेष SIR शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद



प्रफुल्ल शिरसाठ (अमळनेर प्रतिनिधी)

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सावखेडा गावात विशेष SIR प्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. दिवसभर सुरू असलेल्या या शिबिरात नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून SIR प्रक्रिया पूर्ण केली. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे अनेक नागरिकांची SIR नोंदणी व पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली.

शिबिरात उपस्थित अधिकारी, कर्मचारी तसेच स्वयंसेवकांनी नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करून प्रक्रिया सुलभ केली. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवकांनीही मोठ्या प्रमाणावर या उपक्रमाचा लाभ घेतला. नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी शिबिरस्थळी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

यावेळी आयोजकांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा उद्देश असल्याचे सांगितले. गावातील सर्व पात्र नागरिकांनी SIR प्रक्रिया वेळेत पूर्ण करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही करण्यात आले. सावखेडा गावातील नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हे शिबिर यशस्वी ठरले असून गावात मोठ्या प्रमाणावर SIR प्रक्रिया पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.