पत्रकार सचिन काळखैरे
पुणे जिल्ह्यातील सुपे गावात युरिया खताचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, असे असतानाही काही दुकानदारांकडून शेतकऱ्यांना युरिया देण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना खतासाठी ताटकळत ठेवावे लागत
असल्याने त्यांच्यामध्ये संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषी दुकानदारांवर कडक कारवाई करावी, आणि शेतकऱ्यांना विनाविलंब युरिया उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.






Social Plugin