Ticker

6/recent/ticker-posts

साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना स्वरसम्राटचे गीतरूपी अभिवादन...

 


साहित्यसम्राटला स्वरसम्राटची गीतरूपी मानवंदना..


प्रतिनिधी:- रामेश्वर तोंडे मेहकर

मेहकर:- स्वरसम्राट जनजागृती कलासंच,आंध्रुड यांनी साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्ला ता.पातूर जि.अकोला येथे नवयुक मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विविध गीतांच्या माध्यमातून अभिवादन केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला वस्ताद लहुजी साळवे, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

गायक साहेबराव अंभोरे यांनी छत्रपती शिवराया माझा या वंदन गीताने वातावरण मंत्रमुग्ध करून टाकले. त्यानंतर वालू आईचं पोर , कुणी नाय केलं भलं व माय भीमानं केलं ही गीते सादर करून उपस्थितात नवा जोश निर्माण केला.याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांनी अतिशय मौलिक असे प्रबोधनात्मक भाषण केले. त्यांनी स्वच्छता पाळा,अंधश्रद्धा सोडा असा मौलिक संदेश दिला. 

त्यानंतर शाहीर भीमराव अंभोरे यांनी दिली फकिरा भीमाला भेट, गाडी विकली जोडी विकली, अशी एक से बढकर एक प्रबोधनात्मक गीते सादर करून श्रोत्यांमध्ये परिवर्तनवादी विचार पेरला. निलेश बोदडे यांनी मांगाचा छावा, कोहिनूर भारताचा ही गीते अप्रतिम सादर केली. त्यानंतर गायक साहेबराव अंभोरे यांनी रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, जग बदल घालुनी घाव ही गीते सादर करून उपस्थितात नवचैतन्य निर्माण केले.याप्रसंगी शाहीर बाळाभाऊ सरोदे यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा व गोंधळ गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

       महाराष्ट्राचे प्रख्यात बँजो वादक संदीप बोदडे, ढोलक सम्राट अशोक जावळे हार्मोनियम मास्टर साहेबराव अंभोरे यांनी वादनाची उत्कृष्ट साथसंगत दिली तर आपल्या सुमधुर आवाजातून शाहीर दत्ता पवार व सत्यभामाबाई कांबळे यांनी कोरस दिला.शेवटी महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

      कार्यक्रमासाठी अध्यक्ष जीवन वानखडे सचिव विनोद घोडे, उमेश वानखडे, प्रमोद वानखडे श्रीकृष्ण राक्षे, गोपाल घोडे दिनेश वानखडे, संतोष तुळशीराम वानखडे, संजय वानखडे , नवयुवक मंडळ व सर्व गावकरी बंधू भगिनी यांनी मोलाचे सहकार्य केले. साउंड सिस्टमची उत्तम व्यवस्था राजेश वावगे यांनी केली.

कार्ला या गावात सामाजिक ऐक्य,बंधुभाव, मंगल मैत्री, परस्पर सहकार्य आहे हे विशेष... या गावचा आदर्श सर्वांनी घ्यावा असेच येथील वातावरण आहे.