Ticker

6/recent/ticker-posts

सिंदखेड राजा तालुक्यातील ताड शिवणी गावामध्ये आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संरक्षण समिती निवड प्रक्रियेमध्ये नवीन अध्यक्षाची निवड



महाराष्ट्र ग्रामीण प्रतिनिधी महेंद्र खरात


सिंदखेड राजा तालुक्यातील ताडशिवणी गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  संरक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी आज बिनविरोध निवड प्रक्रिया आणि  झाली आणि शाळेला नवयुवक तडफदार सुशिक्षित नवीन अध्यक्ष म्हणून सुशील शिंदे व उपाध्यक्ष म्हणून अमोल शंकर यांची गावकऱ्यांच्या व शाळेच्या वतीने अत्यंत एका मुखाने शाळा संरक्षण समितीवर निवड करण्यात आली शाळेचे मुख्याध्यापक काकर सर यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध निवड प्रक्रिया पूर्ण झाली मावळत्या अध्यक्षाला आणि उपाध्यक्षाला जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या व गावकऱ्यांच्या वतीने निरोप देण्यात आला  गावकऱ्यांच्या वतीने नवीन अध्यक्षांला पुढील येणाऱ्या काळामध्ये शाळेतील मुलांचा शैक्षणिक व आधुनिक शिक्षणाचा दर्जा दर्जेदार करण्यासाठी अध्यक्षांना व उपाध्यक्षांना आपला अमूल्य वेळ देऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताड शिवणी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांना सहकार्य करून जिल्हा परिषद शाळेची शैक्षणिक व मुलांची पटसंख्या वाढवण्याचा भर देण्यात यावा नवीन अध्यक्ष सुशील शिंदे यांनी सर्व गावकऱ्यांना आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेमध्ये पाठवावे असे अहवान  केले आहे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद शाळेतील मुलांची संख्या वाढेल असा ठाम विश्वास जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक काकड सर यांनी व्यक्त केला आहे तर आभार प्रदर्शन बाजड सर व सह शिक्षक पवार सर यांनी केलेआहे अध्यक्ष उपाध्यक्ष निवड प्रक्रिया ला गावातील नवयुवकांची उपस्थिती प्रार्थनीय होती शाळेच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्षांचा छोट्या खाणी सत्कार करण्यात आला