Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र शासनाचा उपक्रम शेलुवाडा येथे क्षयरोग जनजागृती कार्यक्रम व निदान तपासणी शिबीर.



 गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी 

   दिनांक 20/08/26 रोजी शेलुवाडा प्रा. आ. केंद्र धामणी ता. कारंजा येथे संशयित क्षयरुग्नाची आरोग्यवर्धिनी आरोग्यमंदिर शेलुवाडा येथे माझं गाव आरोग्यसंपन्न गाव,टि.बी.मुक्त ग्रामपंचायत मोहीम अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले . मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पांडुरंग ठोंबरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अनिल कावरखे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ सतीश परभणकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ शंकर नांदे,वैद्यकिय अधिकारी डॉ वैद्य, डॉ महाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हॅंड हेल्ड X-ray मशीनद्वारे 125 संशयित क्षयरुग्णाची क्ष किरण तपासणी करण्यात आली.

यावेळी उपस्थित समुदाय आरोग्य अधिकारी डॉ सितल घाटोळे,डॉ जागृती भोजने, श्री अशोक भगत (Dps washim), श्री निलेश पाटील (Sts tho office karanja), कार्तिक शिरसाट (XSO), आरोग्य सेवक श्री राहुल सोनोने , श्री दिपक काळे, आरोग्य सेवीका श्रीमती खडसे, गटपरवर्तक श्रीमती देवळे, श्री जाधव , उपकेंद्रा अंतर्गत सर्व आशाताई उपस्थितीत होत्या .यावेळी 50 संशयिताचे स्पुटम गोळा करण्यात आले तसेच आलेल्या रुग्णाचे आरोग्य तपासणी व औषिधो उपचार देण्यात आला सदर शिबिरा बाबत आलेल्यात रुग्णांनी समाधान व्यक्त केले आणि शिबीराचे नियोजन उपकेंद्र शेलुवाडा यांनी केले .