बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत येथील बुध ता . खटाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत गुणवत्तेची परंपरा जोपासली आहे . शाळेची संपदा प्रविण कोरडे ( २५८ ) , मनस्वी अभय जगदाळे ( २५६ ) , मैथिली गणेश महामुलकर ( २५४ ) , मिथीलेश गणेश महामुलकर ( २५२ ) हे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत .आयझा समीर डांगे , प्रतिक्षा सुनील सुर्यवंशी , श्रेया युवराज बोराटे ,वेदिका गणेश घाटगे , विघ्नेश विकास सुतार , कार्तिक हरिदास कुंभार , कार्तिक बाबासो गोडसे , आराध्या राम घाटगे , शिव पंकज जंगम , अंजली राहुल जगदाळे , स्वरा अविराज शेंडे , यज्ञेश जितेंद्र घाडगे , अभिजित जयवंत उमापे , आराध्या सचिन खवळे , राधिका संतोष माने , आराध्या संतोष काटकर , सई जगदीश खुर्यवंशी , विनायक संभाजी घाटगे , आध्या अभिजीत जगदाळे, ईश्वरी निलेश शेंडे , पाकिजा दस्तगिर झारी हे विद्यार्थी पात्र झाले आहेत . सर्वाधिक गुणवत्ताधारक व सर्वाधिक निकाल कायम राखत शाळेची मान उंचावली आहे .. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वर्षभर काटेकोर नियोजन करुन विदयार्थ्यांची सातत्यपूर्ण तयारी येथील शिक्षक करून घेतात .
या यशस्वी विदयार्थ्यांना वर्गशिक्षक दिपाली नितीन घनवट , नितीन घनवट , मुख्याधिपीका माधुरी नलवडे , जितेंद्र जगताप , दत्तात्रय जाधव , दमयंती अब्दागिरे , उमा रणसिंग आदींचे सहकार्य लाभले . यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे मुख्यमंत्री कार्यालययाचे उपसचिव वैभव राजेघाटगे , आयएएस दिलीप जगदाळे , गटशिक्षणाधिकारी संगिता गायकवाड , विस्तार अधिकारी सोनाली विभूते , केंद्र प्रमुख अजित निकाळजे , सरपंच सौ . सुजाता बोराटे , उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे , माजी प्राचार्य के .डी. पवार , शेखर घाटगे , नितीन खोत , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन सुतार , उपाध्यक्ष श्रध्दा पवार , दयानंद जगदाळे , अंजुम मोमीन व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य , ग्रामपंचायत सदस्य , ग्रामस्थांनी अभिनंदन केले .





Social Plugin