Ticker

6/recent/ticker-posts

'राज्य कर निरीक्षक' पदी अभिजीत वाघमारे;चांडोळ्यात सत्कार


●ग्रामीण प्रतिनिधी महंमद रफी मदार आदमपूरकर.

मुखेड तालुक्यातील ग्राम एकलार येथील तरूण अभिजीत मारोती वाघमारे याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या मे  २०२६ परीक्षेतून राज्य कर निरीक्षक पदी(गट-ब) निवड झाल्याबद्दल मौजे चांडोळा गावकऱ्यांकडून भव्यदिव्य सत्कार करण्यात आला. परिस्थितीचा बाऊ न करता जिद्दीने यश गाठून अभिजीतने घवघवीत यश संपादन केले आहे.

चांडोळा ग्रामचे माजी सरपंच प्रतिनिधी साहेबराव वाघमारे यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते.कार्यक्रम अध्यक्ष म्हणून मुखेड नगरीचे माजी नगरसेवक राहूल लोहबंदे हे तर प्रमुख अतिथी म्हणून पञकार रियाज शेख,मिलिंद लोहबंदे, भाजपा युवा नेते अविनाश काळे, मुख्तार शेठ बेळीकर यांची उपस्थिती होती.यावेळी माजी सरपंच व पं.स.सदस्य शिवलिंग श्रीरामे,महादेव देवकत्ते, राम पाटील, सरपंच साहेबराव कांबळे,उपसरपंच गणेश महाराज ग्रामपंचायत सदस्य संतोष गंगलवाड,राम इंगळे,मुख्याध्यापक भारत सिंगनवाड सिंगनवाड,चांडोळा बँक सहाय्यक महमदरफी मदार, अनिल बनसोडे,व्यंकट पाटील, रहिमोद्दीन शेख,सतीश गायकवाड,केरबाजी गायकवाड, विश्वनाथ वटपलवाड, वाय.बी.गायकवाड,यशवंत सिंगनवाड, नितीन गायकवाड,धोंडिबा गायकवाड, अंकुश कांबळे,विशाल पाटील, अमोल वटपलवाड,पञकार अक्षय गायकवाड व गावकरी उपस्थित होते.सूञसंचालन सामाजिक कार्यकर्ते गुंडेराव गायकवाड यांनी केले.