Ticker

6/recent/ticker-posts

पानसरेवाडी: कृषी ट्रान्सफॉर्मरची महावितरणकडून तातडीने दुरुस्ती



पत्रकार:- सचिन काळखैरे ग्रामीण प्रतिनिधी 

सुपे : पानसरेवाडी येथील बोबडे मळा परिसरातील नादुरुस्त कृषी ट्रान्सफॉर्मरची महावितरणकडून तातडीने दुरुस्ती करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नवीन फ्युज, केबल, फ्यूज आणि फ्युजपेटी बसवली तसेच ट्रान्सफॉर्मरमधील ऑइलची कमतरता पूर्ण केली. 

गेल्या काही दिवसांपासून व्होल्टेजच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना वीजपुरवठा पूर्ववत झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. बोबडे मळा येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.