मुन्ना येरेकार ग्रामीण प्रतिनिधी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारधारेचा प्रचार व प्रसार करणाऱ्या अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी द्वारा संचालित ग्रामगीता जीवन विकास परीक्षा समिती, यवतमाळ जिल्हा यांच्या वतीने वणी तालुका कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. यामध्ये सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे मुन्नाजी येरेकार यांची वणी तालुका ग्रामगीता जीवन विकास परीक्षा युवा संघाच्या कार्यकारी सदस्यपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
ग्रामगीतेतील विचार तळागाळातील तरुणांपर्यंत पोहोचवणे, व्यक्तिमत्त्व विकास घडवणे आणि सामाजिक परिवर्तनाची चळवळ अधिक बळकट करणे, या उद्देशाने ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मुन्ना येरेकार यांच्या निवडीमुळे युवा वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निवडीबद्दल श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरीचे मध्यवर्ती प्रतिनिधी व अन्नदान समिती सदस्य भारत कारडे यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, राष्ट्रसंतांच्या सेवाकार्यात त्यांना पुढील यशस्वी वाटचालीस सप्रेम 'जय गुरुदेव' म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. या निवडीबद्दल विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रांतून मुन्ना येरेकार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





Social Plugin