Ticker

6/recent/ticker-posts

चांडोळा बँकेचा खरब खंडगांवात एफ एसी कँम्प संपन्न



‌ग्रामीण प्रतिनिधी,, मोहम्मद रफी मदार ,दि.२८ जुलै-

मुखेड तालुक्यातील ग्राम चांडोळा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्यावतीने मौजे खरब खंडगाव येथे सोमवार दि.२७ जुलै  रोजी सकाळी ११ वाजता बँक पदाधिकारी व गावातील बँकेच्या ग्राहकांसमवेत यशस्वी संपन्न झाला.

या मेळाव्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील प्रधानमंञी सुरक्षा बिमा योजना,प्रधानमंञी जीवन ज्योती बिमा योजना,२० रू.,४३६ रू.विमा सुरक्षा योजना,अटल पेन्शन योजना,उद्योग,व्यावसाय,बचत गटांना कर्ज वाटप आदि योजनांबद्दल शाखाप्रमुख प्रफुल्लकुमार पुंडगे साहेब यांनी गाव परिसरातील ग्राहकांना संक्षिप्त असे मार्गदर्शन केले.सर्वप्रथम शाखा व्यवस्थापक यांचा सत्कार सरस्वतीबाई काळेवार यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी चांडोळा शाखा व्यवस्थापक प्रफुल्लकुमार पुंडगे साहेब,बँक सहाय्यक महमदरफी मदार,बँक सीआरपी रिजवाना सय्यद,कोमल कदम,बचत गट अध्यक्षा मिराबाई जाधव, हाणिफाबी सय्यद, कोषाध्यक्ष अणुसयाबाई जाधव, सदस्य वर्षा जाधव,सकीनाबी सय्यद इत्यादी बचत गट कार्यकर्ती व समस्त गावकरी मंडळी आदिंची उल्लेखनीय उपस्थिती होती.सूञसंचालन  बँक सीआरपी कोमल कदम  यांनी केले.