महाराष्ट्र ग्रामीण न्यूज प्रतिनिधी : विजय अधिकार
जव्हार (पालघर) : पालघर जिल्ह्यातील जव्हार परिसरात आज, ३१ जुलै २०२६ रोजी दुपारच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. भारतीय प्रमाणवेळेनुसार (IST) सुमारे सायंकाळी ४:४७ वाजता हा भूकंप झाला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.५ इतकी नोंदविण्यात आली.
भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून घराबाहेर धाव घेतली. सुदैवाने, प्राथमिक माहितीनुसार या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी अथवा मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
भूकंपानंतर परिसरात कोणतीही मोठी दुर्घटना घडलेली नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.





Social Plugin