हरयाणा पोलिसांच्या ताब्यात कोल्हापुरातील तरुणाचा मृत्यू! कुटुंबीयांचा गंभीर आरोप |
ग्रामीण प्रतिनिधी. वैभव हराळे
कोल्हापूरातील गजानन महाराजनगर येथील राहुल कदम (वय ३७)यांचा हरयाणा राज्यातील रेवाडी सायबर क्राइम पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २१ जुलै रोजी सायबर गुन्ह्याच्या तपासासाठी हरयाणा पोलिसांचे पथक कोल्हापुरात आले होते. न्यायालयीन प्रक्रियेनंतर राहुल कदम यांना चौकशीसाठी हरयाणाला नेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, राहुल यांच्या कुटुंबीयांनी मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणातील अधिकृत तपास आणि पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
.jpeg)




Social Plugin