स्वप्नील घोटेकार ग्रामीण प्रतिनिधी गुजरी
दि. 30/07/2026 रोजी गुजरी नागठाणा, ता. राळेगाव, जि. यवतमाळ येथे झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतातील उभे पीक पूर्णपणे खरवडून गेले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने लावलेले पीक पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेले आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन व स्थानिक अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन शेताचे पंचनामे करून नुकसानभरपाईची कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.शेतकऱ्यांना न्याय मिळावा व तातडीने मदत जाहीर करावी, हीच अपेक्षा. शेतकरी बांधवांसोबत आपण सर्वजण आहोत!





Social Plugin