Ticker

6/recent/ticker-posts

जुबेर पठाणची राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड



 कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी 

बदनापूर : रत्नागिरी येथे दि. २७ ते ३० ऑगस्ट २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अंडर-१६ अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी ज्ञानगंगा विद्यामंदिर शाळेतील इयत्ता दहावीचा विद्यार्थी झुबेर अजहर पठाण याची निवड झाली आहे.

झुबेरने निवड चाचणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत ६०० मीटर धावण्याच्या क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. त्याच्या या यशामुळे ज्ञानगंगा विद्यामंदिरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

झुबेर हा Light of Life Trust – Badnapur Centre च्या Anando Project मधील विद्यार्थी असून, त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.