बुध दि [प्रकाश राजेघाटगे]
पुसेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भवानीनगर मध्ये 80 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेल्या 10 जिल्हास्तरीय शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला .शिवतेज उदयसिंह रणवरे ,हर्षुल पंकज घनवट ,शंभूराज सागर एकळ, स्वदिप पांडुरंग फडतरे,सृजना भगवान सरवदे, यशराज अजय माने ,राजवीर लव्हेश चोरमले ,काव्या उद्धव मोहिते, विराज विजय बागेकरी,अक्षरा आदित्य चव्हाण , तसेच मार्गदर्शक शिक्षिका सरवदे प्रतिमा भगवान, जाधव मनिषा मार्गदर्शक शिक्षिका व विद्यार्थी यांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल जाधव , उपाध्यक्ष शितल मोहिते, शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र ननावरे ,ग्रामपंचायत सदस्य अनिल बोडके, माजी सैनिक मेजर साळुंखे, समीर जाधव, मेजर अरुण जाधव, मेजर काटकर, सुरज घनवट, यांच्या हस्ते संपन्न झाला .शाळेतील सहशिक्षक शिक्षक शिवाजी गोरे, सुभाष नाळे, प्रमिला घाडगे, रोहिणी फडतरे, रूपाली काकडे, वर्षा सुर्यवंशी तसेच पालक व ग्रामस्थांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न झाला . जिल्हास्तरीय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी संगीता गायकवाड ,विस्तार अधिकारी सोनाली विभूते , केंद्रप्रमुख नवनाथ गावडे, सरपंच , ग्रामपंचायत सदस्य यांनी अभिनंदन केले .





Social Plugin