Ticker

6/recent/ticker-posts

श्री नागनाथ विद्यामंदिर बुध मध्ये स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न



बुध   दि [प्रकाश राजेघाटगे ] 

बुध ता . खटाव येथील श्री नागनाथ विदयालयात  80 वा भारतीय स्वातंत्र्य दिन विद्यालयाचे प्राचार्य श्री अंकुश भांगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपसरपंच अभयराजे घाटगे, सरपंच सौ सुजाता बोराटे, पत्रकार प्रकाश राजे घाटगे, ग्रामपंचयात सदस्या सौ प्राजक्ता कदम, चंद्रकांत चव्हाण, ॲड . सातभाई , माजी प्राचार्य शेखर घाटगे , ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ , माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .ढोल ताशाच्या गजरात उपस्थित मान्यवरांचे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वागत केले . तसेच विद्यालयातील सहशिक्षक श्री भगवान सरवदे यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले .यावेळी संस्कार खवळे या विद्यार्थ्यांनी  प्राचार्यांना विद्यालयाच्या प्रांगणातील ध्वजारोहण करण्याचे निमंत्रीत केले .विद्यालयातील पर्यवेक्षक श्री दडस नाना यांनी स्वातंत्र्य दिनाचा संपूर्ण कार्यक्रम पार पाडला .गीत समूहातील विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत , देशभक्तीपर गीत व सर्व कार्यक्रम मोठ्या उत्साहाने सादर केला.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध मंडळाचे ध्वजारोहण संपन्न केले .बुध ग्रामपंचायतचे ध्वजारोहण सरपंच सुजाता बोराटे मॅडम यांच्या हस्ते संपन्न झाले व  ग्रामस्थांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुध व श्री नागनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील  गुणवंत विद्यार्थी व पालक यांचा सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांनी अभिनंदन केले .स्वातंत्र्य दिनाच्या विद्यार्थ्यांनी घोषणा देऊन चैतन्य निर्माण केले .विद्यालयाच्या प्रांगणात श्री तानाजी पाटील व श्री काळे नवनाथ यांनी विद्यार्थ्यांचे कवायतीचे प्रकार यांच सादरीकरण केले .तसेच झांज पथक कवायती  सहशिक्षक संताजी देसाई यांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतले . सनम मोमीन, अस्था वाईकर ,श्रेया कुंभार व स्वारा जगताप यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आपली भाषणे सादर केली . यासाठी सौ चंदा वाईकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . यावेळी इ.10वी व 12 वी बोर्ड परीक्षा 2027 साठी मंडळाची कॉपी मुक्त प्रतिज्ञा प्रा विशाल नाळे व भगवान सरवदे यांनी विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतली . फेरीमध्ये विविध मंडळांकडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला .यावेळी विद्यालयातील सेवानिवृत्त सहशिक्षिका सौ .रुक्मिणी खोत व सूर्यकांत खोत यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी वह्या व पेन दिले .विविध मंडळाचे व देणगीदारांचे आभार व्यक्त विद्यालयाच्या वतीने करण्यात आले .  विद्यालयातील शिक्षक शिक्षीका ,प्राध्यापक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते व अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला .