Ticker

6/recent/ticker-posts

स्वातंत्र्य दिनाच्या शुभ पर्वावर आ. सिद्धार्थ खरात यांच्या अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात



ताड ताड शिवणी ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमाची उपक्रम व भोजनदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश 

महाराष्ट्र ग्रामीण प्रतिनिधी महेंद्र खरात दि 15 08. 2026.


ताड शिवणी ता सिंदखेड राजा स्वातंत्र्य दिनाच्या पावन पर्वावर मेहकर विधानसभा मतदार संघाचे आमदार मा सिद्धार्थ खरात यांच्या अभिष्टचिंतन सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या मातृभूमी असलेल्या ताड शिवणी गावात ग्रामस्थाच्या वतीने उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात यांच्या आमदार सिद्धार्थ खरात यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गावी दिवसभर विविध कार्यक्रमाच्याउपक्रमामुळे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले अत्यंत साधेपणाने आपुलकीने आणि सामाजिक बांधिलकी जपत ग्रामस्थांनी आमदार साहेबांचा वाढदिवस साजरा केला सर्वसामान्य कुटुंबातून मंत्रालयीन सेवेत प्रवेश करून विधानसभा च्या माध्यमातून आमदारापर्यंत खडतर प्रवास हा संघर्ष जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर सामाजिक बांधिलकीचा असलेला प्रवास हा खूपच वेदनादायी होता आपल्या गावच्या मातीशी असलेले नाते आजही कायम असून ग्रामस्थांच्या मनात त्यांच्याविषयी असलेला जिव्हाळा या सोहळ्यातून प्रकर्षाने दिसून आला आहे आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त बि आर खरात सर यांच्या माध्यमातून भोजनाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमातून वाढदिवस केवळ उत्साह म्हणून न साजरा करता सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला आहे यावेळी गावचे असंख्य ग्रामस्थ विविध पद अधिकारी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार सिद्धार्थ खरात साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घ आयुष्याची उत्तम आरोग्याची आणि पुढील यशस्वी वाटचालीची मंगल कामना करण्यात आली स्वातंत्र्य दिनांच्या उत्साहा सोबतच आपल्या गावच्या भूमिपुत्रांचा वाढदिवस साजरा करण्याची परंपरा ताड शिवणी ग्रामस्थांनी यंदाही जपली त्यामुळे संपूर्ण गावात आनंदाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य अमोल खरात सर यांनी केले तर आभार प्रदर्शन बि आर खरात सर यांनी केले