Ticker

6/recent/ticker-posts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन.



लोहारा प्रतिनिधी | 

लोहारा शहरातील जिजाऊ मेमोरियल प्रशासकीय सेवा महाविद्यालयात आज दि - 01 ऑगस्ट 2026 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने दोन्ही महामानवाच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पवन पवार ( मॅनेजर जना मल्टीस्टेट बॅक, लोहारा ) तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. शंकरजी जाधव ( पालक प्रतिनिधी ) उपस्थित होते. यावेळी श्री. शंकरजी जाधव यांनी दोन्ही महामानवाच्या कार्याला उजाळा दिला. तर अध्यक्षीय समारोपात श्री पवन पवार यांनी महाविद्यालयात विविध कार्यक्रम राबविले जातात त्याबद्दल महाविद्यालयाच्या कर्मचारी व प्राध्यापक, विद्यार्थी यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूञसचलन व आभार उपप्राचार्य यशवंत चंदनशिवे यांनी मांडले. यावेळी दत्तात्रय पोतदार, प्रा. रमेश गिराम, प्रा. प्रियांका जमादार, प्रा. प्राजक्ता लकडे, वैष्णवी सुतार, अनंत मते, राणी माटे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.