Ticker

6/recent/ticker-posts

पुसेगाव पोलीस ठाण्याचा डंका! सातारा जिल्ह्यात तिन्ही महत्त्वाच्या पुरस्कारांत उत्कृष्ट कामगिरी करत ठरले अव्वल



पुसेगाव पोलीस ठाणे जिल्हयात ठरले अव्वल; तीन सर्वोत्तम पुरस्कारांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी गौरवित


बुध  दि (प्रकाश राजेघाटगे )

सातारा जिल्हयातील पुसेगाव पोलीस ठाण्याने उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्यात नवा मान मिळवला आहे. सीसीटीएनएस कामकाज, सर्वोत्कृष्ट सायबर गुन्हे उघडकीस आणणे आणि सर्वोत्कृष्ट नॉन बेलेबल वॉरंट बजावणी या तिन्ही महत्त्वाच्या विभागांमध्ये पुसेगाव पोलीस ठाणे सातारा जिल्ह्यात अव्वल ठरले आहे. पोलीस अधीक्षक मा. श्री. निखिल पििंगळे व अपर पोलीस अधीक्षक मा. श्रीमती डॉ. वैशाली कडूकर यांच्या हस्ते पुसेगाव पोलीस ठाण्याला तीन सर्वोत्कृष्ट पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

 *विविध विभागांमधील उल्लेखनीय कामगिरी:* 

*सीसीटीएनएस कामकाज (जुलै २०२६):** पोलीस विभागांतर्गत सीसीटीएनएस प्रकल्पांतर्गत दैनंदिन कामकाजाचे ऑनलाइन सादरीकरण करावे लागते. यामध्ये गुन्ह्यांचे पंचनामे, चार्जशीट, मोबाईल शोध, तांत्रिक विश्लेषण आणि अंतिम अहवाल अद्ययावत ठेवले जातात. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून दर महिन्याला याचा आढावा घेतला जातो, ज्यामध्ये मा. जुलै २०२६ मधील कामकाजात पुसेगाव पोलीस ठाण्याने सातारा जिल्ह्यात **प्रथम क्रमांक** पटकावला आहे* **सायबर गुन्हे उघडकीस आणणे (जून २०२६):** मा. जून २०२६ मध्ये सर्वोत्कृष्ट सायबर गुन्हे उघडकीस आणण्याच्या कामगिरीत पुसेगाव पोलीस ठाणे जिल्ह्यात अव्वल ठरले. खटाव येथील श्री. चैतन्य बाळासाहेब देसाई यांची २,९१,३८२ रुपयांची online सायबर फसवणूक झाली होती. स.पो.नि. नागनाथ खुणे यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन सायबर कामकाज पाहणाऱ्या महिला पोलीस अंमलदार **अमृता चव्हाण** यांना तांत्रिक विश्लेषणासाठी मार्गदर्शन केले. या सखोल तपासातून पीडित नागरिकाची संपूर्ण रक्कम परत मिळवून देण्यात आली. तसेच प्रवासात, बाजार परिसरात आणि गर्दीच्या ठिकाणी हरवलेले मोबाईल शोधून नागरिकांना परत करण्यात आले.

*नॉन बेलेबल वॉरंट बजावणी:** 

स.पो.नि. नागनाथ खुणे यांनी न्यायालयाकडून प्राप्त नॉन बेलेबल वॉरंटमधील फरार आरोपींचा कसून शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. पोलीस अंमलदार **दौलत कुदळे, यशोदा मोरे, ज्ञानेश्वर जाधव** आणि **बापूराव नवत्रे** यांनी वरिष्ठांच्या सूचनांनुसार सर्वाधिक आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले आहे.

*कौतुक आणि सन्मान सोहळा* 

    दिनांक १८/०८/२०२६ रोजी क्राईम मीटिंग दरम्यान पोलीस अधीक्षक श्री. निखिल पििंगळे, अपर पोलीस अधीक्षक  श्रीमती डॉ. वैशाली कडूकर यांच्या हस्ते पुसेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नागनाथ खुणे ,सीसीटीएनएस कामकाज पाहणाऱ्या अंमलदार अमृता चव्हाण व धडाकेबाज कामगिरी करणारे पोलीस अंमलदार यांना बक्षीस पत्र व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

    या कामगिरीबद्दल कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्रीमती राजश्री तेरणी यांचेही मार्गदर्शन लाभले असून, पुसेगाव पोलिसांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.