विनोद मुत्येलवार गडचिरोली
भगवान महादेवाच्या भक्तीने भारावलेल्या वातावरणात गडचिरोली येथून मार्कंडा कडे भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. सुदरकांड मंडळ एवं मित्र परिवार, गडचिरोली यांच्या वतीने ही कांवड यात्रा आयोजित करण्यात आली असून, मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले.
याप्रसंगी ॲड.प्रणोती सागर निंबोरकर नगराध्यक्ष नगरपरिषद गडचिरोली यांनी कावडयात्रेला सहभागी होऊन शिवभक्तांचा उत्साह द्विगुणीत केला.‘जय श्री राम, बम बम भोले’च्या जयघोषाने तसेच ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. यात्रेदरम्यान कावडधारी भाविक पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन भगवान महादेवाप्रती आपली श्रद्धा व्यक्त करणार आहेत
मनोकामना पूर्ण करणारी ही कावड यात्रा धार्मिक श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारी ठरणार असून,यात्रेच्या माध्यमातून युवकांसह नागरिकांमध्ये धार्मिक संस्कृती, परंपरा आणि आध्यात्मिक मूल्यांची जपणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व शिवभक्तांनी शिस्त, सुरक्षितता आणि परस्पर सहकार्याचे पालन करावे, असे आवाहन आयोजक सुदरकांड मंडळ एवं मित्र परिवार, गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.





Social Plugin