


"आरोग्य शिबिरात १४४ नागरिकांनी घेतला लाभ; मोफत तपासण्या व औषधांचे वाटप."
मन्सूर शहा.धोत्रा भनगोजी.:--
विघ्नहर्ता गणेश मंडळ, धोत्रा भनगोजी यांच्या वतीने बंदाच्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. सध्या मनोबल वॉर्मिंगमुळे निसर्गाचा समतोल बिघडत असून, कुठे अतिवृष्टी तर कुठे कोरडा दुष्काळ अशा परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश मंडळाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पर्यावरण संवर्धनासोबतच राकांच्या आरोग्याची काळजी घेत सोमवार दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल १४४ नागरिकांनी सहभाग घेऊन आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
शिबिरामध्ये विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या, तसेच आबश्यकतेनुसार डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली गोळ्या व औषधांचे मोफत बाटप करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्य जनजागृतीचा उत्सव व्हावा, या उद्देशाने विघ्नहर्ता गणेश मंडळाने हे उपक्रम राबविल्याचे मंडळाच्या पदाधिका-यांनी सांगितले.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश आणि आरोग्यमेवेचा उपक्रम यामुळे विप्नहर्ता गणेश मंडळाच्या सामाजिक उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.




Social Plugin