Ticker

6/recent/ticker-posts

चिखलीत २ किलो गांजा जप्त; एकास अटक 'मिशन परिवर्तन' अंतर्गत पोलिसांची कारवाई; १ लाख ३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.!!



चिखली, २३ सप्टेंबर. मन्सूर शहा (महाराष्ट्र ग्रामीण न्युज) :

 अमली पदार्थांच्या अवैध विक्री व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या 'निशन परिवर्तन 'अंतर्गत चिखली पोलिसांनी कारवाई करीत एका इसमास अटक केली. त्याच्याकडून २ किलो ६६ ग्रॅम गांजा जात करण्यात आला असून, त्याची किंमत १ लाख ३ हजार ३०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात अनली पदार्थांविरोधात मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत चिखली पोलीस ठाण्याचे निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकाला २१ सप्टेंबर रोजी नसीम शेख हसन शेख (वय ३६, रा. इंदिरानगर, चिखली) हा गांजा बाळगत असल्याची माहिती मिळाली.

माहितीची खात्री केल्यानंतर पोलिसांनी इंदिरानगर परिसरतील त्याच्या घरावर छापा टाकला. नायब तहसीलदार नुरलीधर गायकवाड, शासकीय पंच, अधिकृत वजनकाटा धारक आणि छायाचित्रकार यांच्या उपस्थितीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी नसीम शेख याच्या ताब्यातून २ किलो ६६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.

या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड

आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शरद भागवतकर, प्रवीण मोरे, अविनी गाडे, सचिन डेंग, अमोल गवई, विजय किटे, अजय इटावा, राहुल पायधन, प्रशांत धंदर, सुनील राजपूत, निलेश सावळे, ललिता खरात, पंचशीला ससाणे, रुपाली उगले यांच्यासह चिखली पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी कारवाईत सहभाग घेतला.