पुसेगाव पोलिसांची चार हॉटेल्सवर धडक कारवाई
बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली. बुध, ता. खटाव गावच्या हद्दीतील चार हॉटेल्सवर छापे टाकून पोलिसांनी ज्ञानदेव शंकर जाधव, गणेश शंकर डांगे, सुमित सुभाष कुंभार आणि रविराज बळवंत जाधव या संशयीतांवर कारवाई केली. या कारवाईत ६२ हजार ७५ रुपयांची दारू जप्त करण्यात आली.
पुसेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध जुगार, चक्री तसेच दारू विक्री करणाऱ्यांविरोधात परिणामकारक कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी बुध गावच्या हद्दीतील हॉटेल साई दरबार, हॉटेल एस. के. चायनिज, हॉटेल शिवम पॅलेस आणि हॉटेल पाटीलवाडा येथे छापे टाकले. या कारवाईदरम्यान अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करून ६२ हजार ७५ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात यापुढेही वेळोवेळी छापे टाकून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक कोमल शिंगाडे, सपोनि नागनाथ खुणे, पोलिस उपनिरीक्षक व अंमलदार यांनी ही कारवाई केली.





Social Plugin