Ticker

6/recent/ticker-posts

पालम तालुका ग्राम रोजगार सेवक संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर

 


रामेश्वर शिवाजी सुरनर यांची अध्यक्षपदी निवड; विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती..

पालम प्रतिनिधी (रामेश्वर सुरनर)| दि. २८ सप्टेंबर २०२६

पालम तालुक्यात महाराष्ट्र ग्रामरोजगार सहाय्यक कर्मचारी संघटनेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ग्रामरोजगार सेवकांच्या विविध प्रश्नांवर संघटितपणे काम करण्याच्या उद्देशाने ही कार्यकारिणी गठित करण्यात आली असून, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

संघटनेच्या अध्यक्षपदी खोरस येथील ग्रामरोजगार सहाय्यक श्री रामेश्वर शिवाजी सुरनर यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी गोपाळ नरहरी पातळे, सचिवपदी वैभव रामराव बिलापट्टे, तर कोषाध्यक्षपदी शिवाजीराव शेषेराव पुणे यांची निवड करण्यात आली.

तसेच संघटनेच्या सर्कलनिहाय जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या असून पेठ शिवणी सर्कल प्रमुखपदी ज्ञानेश्वर गोविंदराव शिंदे, चाटोरी सर्कल प्रमुखपदी दिगंबर बाबाराव पैके, रावराजूर सर्कल प्रमुखपदी प्रमुखपदी विठ्ठल गंगाधर पौळ, व बनवस सर्कल प्रमुख ज्ञानेश्वर रामदास शिंदे यांची निवड करण्यात आली.

याशिवाय सल्लागार व प्रसिद्धीप्रमुखपदी शेषराव मोहनजी सोपणे यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या माध्यमातून पालम तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांच्या अडचणी, प्रलंबित प्रश्न, कामकाजातील समस्या तसेच विविध मागण्यांसाठी प्रशासनाकडे प्रभावीपणे पाठपुरावा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. ग्रामपातळीवर रोजगार हमी योजनेची कामे प्रभावीपणे राबविताना ग्रामरोजगार सहाय्यकांना येणाऱ्या अडचणी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी संघटना सक्रियपणे काम करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या माध्यमातून ग्रामरोजगार साहाय्याकांच्या हितासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यकारिणीच्या निवडीबद्दल तालुक्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.