सैय्यद मजहर अली @ अकोट प्रतिनिधी
धारणीवरून अकोटच्या दिशेने येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये एक अंदाजे ४५ ते ५० वर्षे वयाचा अनोळखी इसम बेशुद्धावस्थेत मिळून आला असून, रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, आज २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११:१५ च्या सुमारास ट्रॅव्हल्स क्रमांक MH 30 AA 7415 ही धारणीवरून अकोट येथे जाण्यासाठी निघाली होती. प्रवास सुरू असताना सावऱ्या गावाजवळ ट्रॅव्हल्समध्ये मागे बसलेला एक अनोळखी इसम (वय अंदाजे ४५ ते ५० वर्षे) अचानक बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. चालकाने प्रसंगावधान राखून सदर इसमाला उपचारासाठी तातडीने जिल्हा उपरुग्णालय, धारणी येथे दाखल केले; मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
धारणी पोलीस ठाण्यामार्फत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या मृत इसमाची अद्याप ओळख पटलेली नाही. तरी सदर इसमाबाबत कोणास काही माहिती असल्यास किंवा कोणी ओळखत असल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
संपर्क क्रमांक:
मा. पोलीस निरीक्षक, धारणी पोलीस स्टेशन: ८०८७०००२१५
श्री. एस. आर. डोंगरे (सहाय्यक पोलीस निरीक्षक): ७०३८५१७११४
इतर संपर्क क्रमांक: ९८३४२०३४२५ (पोलीस कॉन्स्टेबल नामदेव)





Social Plugin