Ticker

6/recent/ticker-posts

पानसरेवाडी बोबडेमळा येथे महावितरणची वीज चोरांवर कारवाई




पत्रकार :- सचिन काळखैरे 

ग्रामीण प्रतिनिधी 

12 सप्टेंबर 2026 सुपे

पानसरेवाडी येथील बोबडे मळ्यातील ट्रान्सफॉर्मरच्या वारंवार नादुरुस्तीच्या समस्येवर महावितरणने कारवाई केली आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती करण्यात आली होती, मात्र अतिरिक्त आणि अनधिकृत वीज वापरामुळे तो वारंवार खराब होत होता. परिसरातील शेतकऱ्यांनी या समस्येची तक्रार केली होती.

महावितरणच्या पथकाने तपासणी मोहीम राबवून अनधिकृत वीज वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे.

वीज चोरीसाठी वापरलेल्या केबल ताब्यात घेतल्यामुळे जो अनधिकृत वीज वापर होता तो कमी झाल्यामुळे, ट्रान्सफॉर्मरवरील अतिरिक्त भार कमी होण्यास मदत होणार आहे.

शेतकऱ्यांनी भविष्यात सिंगल फेज मोटारी वापरू नयेत व जो आठ तास थ्री फेज पुरवठा आहे त्या वेळेतच थ्री फेज मोटर वापरावी तसेच,

इथुन पुढे महावितरण कडून नियमित तपासणी करून विजचोरी करणाऱ्या वर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.