बुध दि [ प्रकाश राजेघाटगे ]
भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन आमदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुसेगावच्या नळ पाणीपुरवठा योजनेची आखणी करण्यात आली आहे. पुढील २० वर्षांचा विचार करून साकारण्यात आलेल्या जलजीवन मिशनअंतर्गत टप्पा क्रमांक एकमधील या महत्त्वाकांक्षी योजनेचा उद्घाटन सोहळा गोरे वस्ती येथे आमदार महेश शिंदे व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या हस्ते झाला. या योजनेमुळे पुसेगावातील नागरिकांना नियमित व शुध्द पाणीपुरवठा मिळण्यास मदत होणार असून, गावाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी आणि सोडवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
आ. महेश शिंदे म्हणाले, "जलजीवन मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला योजनेची आखणी करण्यात आली आहे. नागरिकांना नियमित, शुध्द आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळावा, यासाठी या योजनेच्या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे. उर्वरित कामेही गतीने पूर्ण करून संपूर्ण क्षेत्राचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
नळाद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. पुसेगाव हे वाढती लोकसंख्या असलेले महत्त्वाचे गाव असल्याने भविष्यातील गरजा लक्षात घेऊन सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गावासाठी दीर्घकालीन पाणीपुरवठा योजना साकारत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
यावेळी मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ज्येष्ठ नेते डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, संतोष ऊर्फ बाळासाहेब जाधव, प्रशासक विशाल जाधव, प्रशासकीय समितीचे सदस्य, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता पल्लवी मोटे,उपअभियंता आदिनाथ शिरसाठ, तेजश्री लेंढवे, सहायक अभियंता अक्षय पाटील, सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ खुणे, ग्राम महसूल अधिकारी अमित हिरके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. रणधीर जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विशाल जाधव यांनी केले. सूत्रसंचालन मोहनराव गुरव यांनी केले. आभार ग्रामविकास अधिकारी ए, जे. नागरगोजे यांनी मानले.
शुध्द पाण्यामुळे आजारांपासून बचाव
जलजीवन मिशनमुळे प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे नियमित व शुध्द पाणी उपलब्ध होणार आहे. पाण्याचे नैसर्गिकरीत्या फिल्टरेशन होणार असल्याने साथीच्या आजारांपासून बचाव होण्यास मदत होईल. या योजनेमुळे गावातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे," असे प्रशासक विशाल जाधव यांनी सांगितले.
पुसेगावच्या सर्वांगीण विकासासाठी पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले. त्यांच्या पुढाकारामुळे आणि





Social Plugin