ग्रामीण प्रतिनिधी केरबा गवते माजलगाव
गोविंदपूर : माजलगाव तालुक्यातील गोविंदपूर गावात शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सण असलेला बैलपोळा पारंपरिक व सांस्कृतिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना स्वच्छ धुऊन, रंगीबेरंगी झुली, फुलांच्या माळा व विविध अलंकारांनी सजवले. त्यानंतर बैलांची विधिवत पूजा करून नैवेद्य दाखवण्यात आला. गावातील नागरिकांनी पोळ्यानिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या. लहान मुले व ग्रामस्थांनी सजवलेल्या बैलांची मिरवणूक पाहण्याचा आनंद घेतला. वर्षभर शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामात मोलाची साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही परंपरा आहे. गोविंदपूरमध्ये पोळ्याच्या निमित्ताने गावातील पारंपरिक संस्कृती, शेतकरी जीवन आणि आपुलकीचे दर्शन घडले.





Social Plugin