Ticker

6/recent/ticker-posts

शेवरे गावात पारंपरिक पोळा सण उत्साहात साजरा






सटाणा तालुक्यातील शेवरे गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पोळा सण मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना स्वच्छ धुऊन, रंगीबेरंगी सजावट करून आकर्षक पद्धतीने सजवले होते. बैलांच्या शिंगांना रंग लावून तसेच गोंडे, फुलांच्या माळा व विविध अलंकारांनी त्यांची सजावट करण्यात आली होती.

पोळ्यानिमित्त गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी आपल्या सर्जा-राजाची पूजा करून बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सजवलेल्या बैलांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थ, महिला, युवक व बालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

शेतीच्या कामात वर्षभर शेतकऱ्यांना साथ देणाऱ्या बैलांचा सन्मान करण्याची ही परंपरा शेवरे गावात आजही जपली जात असून, पोळा सणामुळे गावात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.