Ticker

6/recent/ticker-posts

आदमपूरात तलाठी भवन बांधकाम अर्धवट;पूर्ण करण्याची गावकऱ्यांची मागणी..





आदमपूरात तलाठी भवन बांधकाम अर्धवट;पूर्ण करण्याची गावकऱ्यांची मागणी.. 


ग्रामीण प्रतिनिधी-कपिल भुरे आदमपूरकर

 बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथील गावतलाव 'कुंटा' परिसरात तलाठी भवन बांधकाम अर्धवट असल्याचे सद्यस्थितीत चित्र आहे. शासनाने एकीकडे लाखो रुपये खर्च करून इमारत करावी व त्या इमारतीमध्ये सगळे कामे व्हावीत. तालुक्याच्या ठिकाणी न जाता गावातच अधिकारी राहावे व गावकऱ्यांची सोय व्हावी, म्हणून शासनाने गाव तिथे तलाठी भवन उभा करण्याचे ठरवले आहे.त्यात आदमपूर येथे तलाठी भवन जवळपास मंजूर होऊन एक वर्ष झाले असून यांचे काम नऊ महिन्यांपासून चालू आहे. अंदाजीत रक्कम ११ ते १२ लाख रुपये एवढी असून येथील गुत्तेदार मात्र थातूरमातूर पद्धतीने काम करून अर्धवट ठेवले आहे. 

या तलाठी भवनला इमारतीला पाणी नाही,क्युरींग नाही,त्यामुळे आत्तापासूनच नऊ महिन्यांमध्ये या कामाचा बोजवारा उडाला आहे.यामध्ये एक स्टोअर रूम व दोन रूम व शौचालय बाथरूम असे असताना तिथे शौचालय नाही.अजून अजून गिलावा नाही नुसत्या भिंती आहेत. पण त्या भिंतीला पाणी पण टाकत नाहीत, नऊ महिन्यांपासून गुत्तेदार, कंत्राटदार फरार आहेत.असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्या रूमांमध्ये, दारूच्या बाटल्या इतरत्र पडलेल्या आहेत. त्या तलाठी भवनाची बिकट अवस्था झालीअसून, अजून काम शिल्लक भरपूर आहे. परंतु, याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. यात अंतर्भूत तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांचे त्या कामावर लक्ष नाही.म्हणून सदरील काम येथील कंत्राटदार अर्धवट सोडून दिले आहे.हे काम दिवाळीपर्यंत पूर्ण होईल काय व तलाठी भवन दिवाळीपर्यंत चालू होईल काय, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तरी येथील कंत्राटदार लवकरात लवकर राहिलेले हे काम पूर्ण करण्याची मागणी गावकऱ्यांसह प्रकट होत आहे.