उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे होणाऱ्या १९ वर्षांखालील स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार
बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
जाखणगाव (ता. खटाव) येथील शंभूराज किरण शिंदे याची अहिल्यानगर येथे झालेल्या ४५ व्या राज्यस्तरीय शूटिंग बॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेतून महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे होणाऱ्या १९ वर्षांखालील स्पर्धेत तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. या निवडीबद्दल शंभूराजचे जाखणगाव ग्रामस्थांकडून अभिनंदन होत आहे.
शंभूराज हा खटाव येथील शहाजीराजे महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याच्या या यशामुळे जाखणगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शंभूराजचे वडील किरण शिंदे हे शेतकरी आहेत. शेतकरी कुटुंबातील शंभूराजने मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळविलेल्या या यशाचे परिसरातून कौतुक होत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, खटाव तालुका संयोजक म्हणूनही तो कार्यरत आहे.





Social Plugin