Ticker

6/recent/ticker-posts

अमोल काला यांच्या वाढदिवसानिमित्त पाणपोई सुरू; गोमातेला चारा वाटप.






कैलाश कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी 

मंठा | दिनांक : २१ ऑक्टोबर २०२६**

मंठा : अमोल काला यांच्या वाढदिवसाच्या स्मृतिप्रीत्यर्थ शालेय विद्यार्थी, गोरगरीब नागरिक आणि वाटसरूंसाठी महावीर मोबाईल शॉपी, मंठा येथे थंड पाण्याची पाणपोई सुरू करण्यात आली. तसेच माँ भगवती गोशाळा, देवी रोड, मंठा येथे गायी व वासरांना चारा वाटप करण्यात आले.

या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांची तहान भागविण्यासोबतच मुक्या प्राण्यांप्रती दयाभाव व्यक्त करण्यात आला

यावेळी संजय छल्लाणी, भारत बोराडे, प्रेमगोपाल कासट, शिवाजी बोराडे, राजू आकमार, राधाकिशन बोराडे, डॉ. व्यंकटेश देशपांडे, भगवान जायभाये, राजेश मणियार, लक्ष्मीकांत लखोटीया, गोविंद भरतीया, अजय तायल, रवि चोकडा, अरुण बोडखे, सोनू अग्रवाल, सोनटक्के, सचिन साबू, गिरीश मुरक्या, अमोल नागरे, मिथुन काला आणि चि. नैतिक काला आदी मान्यवर उपस्थित होते.