सोनपेठ ( प्रतिनिधी ) शिवशंकर तुपकर दि. 23 -10- 26
सोनपेठ तालुक्यातील मौजे लासीना येथे भागवत स्वरूप निष्काम कर्मयोगी श्री वै.ह.भ.प.पंडीतगुरु पार्डीकर महाराज यांच्या ३१ व्या पुण्यस्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण तथा श्रीमद् भागवत कथा ज्ञानराज सोहळा दि २३ ऑक्टोबर पासून प्रारंभ झाला आहे.यामध्ये हरिनाम,जगर,काकडी आरती, किर्तन, ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद् भागवत कथा यांसह अन्य विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार असून याचा लाभ पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
सोनपेठ तालुक्यातील मौजे लासीना येथे वै ह.भ.प. पंडीतगुरू पार्डीकर महाराज यांची समाधी गोदावरी नदीच्या पात्रात आहे.त्यांच्या पुण्यस्मरणार्थ निमित्ताने दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमदभागवत कथा आहे भागवताचार्य ह.भ.प.दिलिप महाराज ब्रम्हपुरीकर हे राहणार आहेत.या अखंड हरिनाम सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत किर्तन संपन्न होणार आहे. यामध्ये दि २३ रोजी ह.भ.प.गुरुवर्य राजेभाऊ महाराज पार्डीकर,दि २४ रोजी ह.भ. प. भागवताचार्य सुधीर महाराज, दि २५ रोजी ह. भ. प. भागवताचार्य पोपट, महाराज कासारखेड दि.२६ रोजी ह. भ. प. गुरुवर्य नाथ बाबा माने महाराज दि. २७ रोजी ह. भ. प. अनंत महाराज शास्त्री दि. २८ रोजी ह. भ. प. चांगदेव महाराज शास्त्रीजी दि.२९ रोजी ह. भ. प. दत्ता महाराज आंबोलीकर यांचे रात्री किर्तन होणार आहेत तर दि. ३० रोजी ह. भ. प. मधुसूदन महाराज दैठणकर यांचे काल्याचे किर्तन सकाळी
१२ ते १ या दरम्यान होईल या किर्तन श्रवणाचा व महाप्रसाद लाभ पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी घ्यावा असे संयोजकांनी आवाहन केले आहे. (तालुका प्रतिनिधी)





Social Plugin