Ticker

6/recent/ticker-posts

विजयादशमीनिमित्त आदमपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन



पंचशील ध्वजारोहण करून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

ग्रामीण प्रतिनिधी-कपिल भुरे आदमपूरकर 

बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथे विजयादशमी तथा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आदमपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून, धूप-दीप प्रज्वलित करत अभिवादन करण्यात आले. यावेळी पंचशील ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या या दिवसाला बौद्ध अनुयायांच्या जीवनात विशेष महत्त्व आहे.

या निमित्ताने आदमपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक योगदानाचे स्मरण करण्यात आले. पंचशील ध्वजारोहणातून भगवान गौतम बुद्ध यांच्या मानवतावादी विचारांचा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समताधिष्ठित समाजनिर्मितीच्या संकल्पनेचा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, बौद्ध धर्माचे अनुयायी तसेच नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि समाजात समता व बंधुभाव रुजविण्याचा संकल्प व्यक्त केला.