देवगड प्रतिनिधी अमोल शिर्के महाराष्ट्र ग्रामीण न्युज
सध्या कोकणामध्ये हापूस आंब्याची चाहूल लागलेली आहे व कोकणातून हापूस आंब्याची इंट्री मुंबईच्या वाशी मार्केटला झालेली आहे. आंब्याचा हंगाम अजून दूर असला तरी देवगड येथील गिर्ये गावातील प्रगतशील आंबा बागायतदार मिलेश वसंत बांदकर यांनी आपल्या बागेतील हापूस आंब्याची पहिली पेटी गुरुवार 29 ऑक्टोंबर रोजी संकष्टीच्या मुहूर्तावर वाशी मार्केटला मुंबई येथे रवाना केली गेली आहे. हंगामापूर्वीच हा आंबा कसा काय या सर्व कोकणातील आंबा उत्पादकानाचे लक्ष वेधले गेले आहे. ही आंब्याची पेटी जनार्दन अँड कंपनी(JAC या दलाला मार्फत या पेटीची विक्री होणार असून तिला आता किती दर मिळतो याबाबत सर्व कोकणातील शेतकऱ्यांना उस्तुकता लागलेली आहे. देवगडच्या हापूस आंब्याला चव सुगंध काही वेगळाच असा आहे. या हापूस आंब्याचे उत्पादन लवकर घेण्याचा प्रयोग मिलेश बांदकर यांनी यशस्वीरित्या केला आहे. त्यांच्या बागेतील साडेसहा डझन आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केट बाजारपेठ येथे रवाना झाली असून दोन वर्षांपूर्वीही नोव्हेंबर महिन्यात वाशी मार्केटला आंब्याच्या पेट्या पाठवण्यात आल्या होत्या आणि त्यांनी हा पहिला मान कोकणात देवगड येथे मिळवला आहे. जून महिन्यातच यांच्या झाडाला मोहर आला व त्यांनी मोरा पासून फळधारणा होऊन आंब्याचे उत्पादन कसे चांगल्या प्रकारे मिळेल या पद्धतीने त्यांनी विशेष काळजी घेतली.
मोर आलेल्या चार ते पाच कलमांना त्यांनी प्लास्टिकचे कागदाचे आवरण घालून झाडांना त्यांनी संरक्षण दिले व त्याच बरोबर वेळोवेळी आवश्यक त्या फवारण्या करून मोहर आणि फळांची निगा व्यवस्थित राखली गेल्यामुळे व योग्य व्यवस्थापन आणि सातत्यापूर्ण प्रयत्न यामुळे त्यांनी हापूस आंब्याची पहिली पेटी ही वाशी मार्केट मुंबई येथे पाठवण्यात त्यांना यश मिळालेले आहे. मिलेश बांदकर हे विजयदुर्ग विभागातील प्रगतशील आंबा बागायतदार असून त्यांचे बंधू विद्याधर बांदकर त्यांच्यासोबत ते सुद्धा आंबा व्यवसाय करतात व बागेचे व्यवस्थापन व उत्पादनाचे नियोजन आणि आंब्याचे संगोपन ते व्यवस्थित करतात. त्यांच्या या परिश्रमाला कोकणातील आंबा जे बागायतदार आहेत यांनी अभ्यास करून आपले सुद्धा पीक कसे लवकरात लवकर येईल याची आखणी करावी. त्याचप्रमाणे देवगड येथे वाडा, गावातून हापूस आंब्याची अजून एक पेटी मुंबईच्या वाशी मार्केटला रवाना झालेली आहे त्या शेतकऱ्याचं नाव असे आहे की वीरेंद्र कांबळी त्यांनी सुद्धा देवगड हापूस आंब्याचा शुभारंभ शहा ऍड बाटे फॉर्म मार्फत ६ डंजन आंबे हे पाठवलेले आहेत.
त्यांनी सुद्धा गुरुवार 29 ऑक्टोंबर रोजी वाशी मार्केटला आंबा पेटी पाठवली गेलेली आहे. याही शेतकऱ्याचे कौतुक करण्यासारखे शेतकरी आहेत. त्याचप्रमाणे आपल्या भारतातील तामिळनाडू या राज्यातून सुद्धा हापूस आंब्याची पेटीची रवानगी मुंबईच्या वाशी मार्केटला झालेल्या आहेत. त्यांचा एक डझनाचा भाव 2500 रुपये असा आहे. जे आंबे खाणारे खवय्ये आहेत त्या आंब्याचा मनमुराद आस्वाद घेताना दिसणार आहेत. अशा लवकरात लवकर जे यशस्वी शेतकरी आंब्याचं पीक घेत आहे ही अभिमानास्पद व गौरवास्पद अशी शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी बाब आहे तेव्हा परमेश्वर त्यांना असंच भरघोस पीक देऊ व इतर शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांचे मार्गदर्शन घेऊन आपलं पीक कसं भरघोस येईल याची प्रत्येक शेतकऱ्यांनी आखणी करावी





Social Plugin