अंबड प्रतिनिधी गणेश राऊत
अंबड तहसील कार्यालयात तहसीलदारांसमोरच महसूल कर्मचाऱ्यांमध्ये झटापट झाल्याची घटना समोर आली आहे. शासकीय कार्यालयातच कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या या प्रकारामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नागरिकांच्या विविध महसूलविषयक कामांसाठी महत्त्वाचे असलेल्या तहसील कार्यालयातच कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण होऊन झटापट झाल्याने या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. तहसीलदारांसमोरच हा प्रकार घडल्याने कार्यालयातील शिस्त आणि प्रशासकीय कामकाजावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
या झटापटीमागील नेमके कारण काय, संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये कोणत्या विषयावरून वाद झाला आणि या प्रकरणी प्रशासनाकडून काय कारवाई केली जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
महसूल प्रशासन या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर योग्य कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.





Social Plugin