Ticker

6/recent/ticker-posts

नमिता चौधरी च्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा आर्य वैश्य समाजाचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन


बाळासाहेब पवार ग्रामीण प्रतिनिधी

छत्रपती संभाजी नगर येथील नमिता चौधरीचा खून करण्यात आला तिची हत्या करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी आर्य वैश्य समाज बांधवांनी माननीय उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना दिनांक 29 मार्च 2024 रोजी निवेदनाद्वारे करण्यात आले छत्रपती संभाजीनगर येथील नमिता चौधरी हीचा दिनांक 21 मार्च रोजी संशयास्पद मुर्त्यू झाला याबाबत पोलिसात आत्महत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे मात्र नमिताचा मृत्यू हा आत्महत्या नसून हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला यात त्यांनी सासरच्या मंडळींनी खून केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे

 या प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या नमिता हीच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी पसार होण्याकरिता संधी दिली असा आरोपही निवेदनातून केला आहे सदर प्रकरणाबाबत माननीय मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री तसेच माननीय गृहमंत्री यांना सदर प्रकरण अवगत करून नमिता हिच्या मारेकऱ्यांना त्वरीत अटक करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष सुरेंद्र कोडगिरवार, डॉ. सचिन मामीडवार, डॉ. गजानन कोडगिरवार, किरण मुक्कावार, सचिन निलपवार, महेश पत्तेवार, गजानन रेवनवार, उदय पत्तेवार, वैभव कोडगिरवार, गोपाल मुक्कावार, गजानन व्यवहारे, जगदीश भुसावार, स्वाती निलावार, कोमल कोडगिरवार, संगीता व्यवहारे श्रद्धा मामीडवार, सुषमा उत्तरवार, प्रतिभा चक्करवार यांच्यासह इतरही समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.