बाळासाहेब पवार ग्रामीण प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद उमरखेड हरदडा फाटा जोडणारा राज्य महामार्ग क्र. २६२ करिता २४१ कोटी रुपयाचा निधी शासनाने मंजूर केला आहे. दिनांक १२ एप्रिल २०२४ पर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामास सुरुवात होणार अशी सूत्रांकडून माहिती आहे. वास्तवात पाहता पुसद उमरखेड हरदडा फाटा हा राज्य महामार्ग जागोजागी खड्डे पडून खराब झाला होता. पुसद ते हरदडा फाटा हे अंतर जवळपास ५४ कि. मी. आहे. आजच्या परिस्थितीत हे ५४ कि.मी. अंतर पार करण्यास वाहनास दोन ते अडीच तास लागतात. तसेच रस्ता उखल्यामुळे धुळीचा सुद्धा नागरिकांना भरपूर त्रास सहन करावा लागत होता. सदर राज्य महामार्गा करिता शासनाने निधी मंजूर केल्यामुळे लवकर काम पूर्ण होऊन नागरिकांना दळणवळण करणे सोईचे होईल व वेळेची बचत सुद्धा होईल. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .





Social Plugin