Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्यामुळे पत्रकार भगवान खरे यांचा सत्कार

 


भारत शिंदे ग्रामीण प्रतिनिधी

कळवण तालुक्यातील देसराणे येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार भगवान खरे यांना शासनाकडून दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, प्रदान करण्यात आला. त्यांना हा पुरस्कार मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री. अजित पवार. तसेंच आयुक्त ओमप्रकाश बकोरिया. यांच्या हस्ते देण्यात येऊन भगवान खरे यांना गौरविण्यात आले. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात परमपूज्य शेषराव महाराज व्यसन मुक्ती संघटना शिरपूर बुलढाणा यांच्या माध्यमातून हजारो लोकांना व्यसनमुक्त होण्यासाठी प्रवृत्त केले..  व विश्व जागृती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अनेक जनहितार्थ सामाजिक   उपक्रम राबवले व परमपूजनी शेषराव महाराज यांचे उत्तराधिकारी संतोष महाराज यांचे अनेक ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करून त्या ठिकाणी अनेक व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्त होण्यासाठी परावृत्त केले.

त्यांच्या अशा सामाजिक कार्यातुन अनेक व्यसनाधीन व्यसनमुक्त झाले आहेत. अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असल्याने त्यांच्यां या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली म्हणून त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. देवेंद्र फडवणीस. अजित पवार. तसेच आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या उपस्थितीत  डॉ . बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आल्यामुळे महात्मा फुले हायस्कूल मोकभनगीच्या वतीने  त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष दत्तू गोविंदा पवार,.मुख्याध्यापिका श्रीमती आहेर व्ही आर मॅडम, कापडणे सर. शिंदे सर. इंगळे सर. गावित मॅडम. देवरे मॅडम. गायकवाड मॅडम.  भोये सर. शिरसाट सर.  वाघ मॅडम मुंदनकर मॅडम. वाघ सर. व . प्रकाश शेवाळे. महाराष्ट्र ग्रामीणचे पत्रकार. भारत शिंदे हे उपस्थित होते तसेच  गुरुदेव कृषी सेवा केंद्र मोकभनगी चे संचालक मा. आबासाहेब पवार यांच्याकडूनही त्यांचा सत्कार करण्यात आला.