Ticker

6/recent/ticker-posts

उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा मेहकर येथे संपन्न!


          विद्यमान खासदार आणि आमदार यांचा घेतला ठाकरे स्टाईल मध्ये खरपूस समाचार.

(शेख बाबा प्रतिनिधी लोणार)

मेहकर येथे नगर परिषदेच्या स्वतंत्र मैदानावर  आज दुपारी 3 वाजता भर उन्हात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटात गेलेले विद्यमान खासदार व आमदारावर आपल्या खास शैलीत तुफान हल्ला चढवला. दरम्यान त्यांनी आपल्या पक्षाच्या लोकसभा उमेदवाराची घोषणा केली नाही, मि जो उमेदवार देईल त्याला विजयी करण्याचा शब्द त्यांनी आपल्या कार्यकर्त्याकडून घेतला.

धर्मवीर स्व. दिलीपराव रहाटे यांचे स्मरण करून उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात केली. त्यांनी रोवलेल्या बीजाची फळे येथे सगळे चाखत आहोत असे प्रतिपादन केले. खा. संजय राऊत म्हणाले ज्यांना खासदारक्या आमदारक्या मिळाल्या त्यांनी शिवसेनेच्या नावावर स्वतःची प्रॉपर्टी वाढवली व जनतेला कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून आपलाच विकास केला. आमच्याशी गुंडगिरी करू नका तुम्ही  गुंड असाल तर आम्ही महागुंड आहोत पण आमची गुंडगिरी ही जनतेच्या कामासाठी आहे असेही ते म्हणाले.

यावेळी  विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. नितीन देशमुख, नरेंद्र खेडेकर, जालिंदर बुधवत, आशिष राहाटे, लुकमान कुरेशी, गोपाल बच्छिरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.