Ticker

6/recent/ticker-posts

अल्पवयीन पीडित मुलीची अवघ्या 48 तासात शोध लावून सुटका, आरोपीस अटक



बाळासाहेब पवार ग्रामीण प्रतिनिधी

पोलीस स्टेशन पोफाळी येथे फिर्यादी रा. टाकळी, ह. मु. पळशी, ता. उमरखेड ह्यानी फिर्याद दिली की, दि. 15/03/2024 रोजी फिर्यादी व त्यांची पत्नी ह्यांनी पळशी येथील देशमुख यांच्या शेतात ऊस तोडीचे दिवसभर काम केले, सायंकाळी 05.00 वा. काम बंद केले त्यावेळी त्यांची मोठी मुलगी वय 14 वर्ष ही माझं पोट दुखत आहे मी आराम करते असं म्हणून खोपी वर गेली, काही वेळाने फिर्यादी हे घरी गेले असता मुलगी दिसून आली नाही, तीचा आजूबाजूला शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही, त्यावेळी ऊसतोडी मधील मजूर सय्यद बबलू उर्फ मौला सय्यद अब्दुल, वय 25 वर्ष, रा. सुकळी, ता. उमरखेड हा सुद्धा तिथे दिसला नाही 

यावरून संशय वरून फिर्यादीने पो.स्टे. पोफाळी येथे त्यांच्या मुलीला फूस लावून पळवून नेले बाबत तक्रार दिली, वरून पो.स्टे. ला अप. क्र. 97/2024 भा. द.वि. कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेतला. सदर गुन्ह्याच्या तपासात पोफाळी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध लावला, व पो.स्टे. पोफाळी येथील PSI आशिष झिमटे, NPC नाना म्हस्के, PC लखन जाधव, LPC नीलम श्रीवास यांनी अल्पवयीन मुलगी व आरोपी सय्यद बबलू उर्फ मौला सय्यद अब्दुल यास करीमनगर, तेलंगणा येथून ताब्यात घेतले. सदर पीडित मुलीसोबत आरोपीने जबरदस्ती वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले व कोणाला सांगितल्यास मारण्याची धमकी दिली अशा पीडितेच्या बयाणावरून सदर आरोपी विरुद्ध कलम 366(अ),376(3), 376(2)(n), 506 भादवी सहकलम 4,6 पोकसो कायदा अन्वये कलम वाढ करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोफाळी पो.स्टे. चे ठाणेदार सहा. पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI आशिष झिमटे करीत आहेत.