प्रेम राठोड ग्रामीण प्रतिनिधी खेड:-
आर्णी तालुक्यातील खेड येथे दि. 17 व 18 मार्च 2024 रोजी अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस झाले, त्यामुळे तोंडाशी आलेले पिक गहू, हरभरा, तीळ, मक्का, ज्वारी व इतर पिकाचे अतिशय प्रमाणात नुकसान झाले असून, या अवेळी वादळी व गारपीट पावसाने खेड गावा सह संपुर्ण यवतमाळ जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे, नुकसान झाले आहे. तोंडाशी आलेली पिके सोसाट्याच्या वाऱ्याने जमीन दोस्त झाले, आहे, तर सोसाट्याच्या वाऱ्याने सोंगुन लावलेले हरभरा ची ढीगाच्या ढीग आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात उडाली आहे, तर गारपिटीने गहू सह इतर पिकांचे अती नुकसान केले आहे.
यवतमाळ जिल्हयातील शेतकरी पहिलेच अस्मानी संकटाने हवालदिल असून हाताशी आलेली पिके नुकसान झाल्याने चिंतातूर असून शासन प्रशासनाने तत्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी खेड सह तालुक्यांतील शेतकऱ्यांची मागणी करतांना दिसत आहे.





Social Plugin