Ticker

6/recent/ticker-posts

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पाटण महसूल प्रशासन अलर्ट


 पाटण ( दिनकर वाईकर) 

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पाटण प्रशासन सज्ज झाले आहे. मतदान ओळखपत्र जवळजवळ दोन लाख 98 हजार वाटले आहेत .12 हजार 676 नवीन मतदारांना ओळखपत्र वाटले आहेत गत पंचवार्षिक लोकसभेला 55 .90 % मतदान झाले होते .जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करत आहोत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत सुनील गाढे यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महसूल विभाग निवडणूक शाखा यांच्या वतीने पाटण येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. प्रांताधिकारी गाढे म्हणाले ,पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे तिसऱ्या टप्प्यात सातारा जिल्हा आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे .या यात्रा कमिटीने खबरदारी घ्यावी लाऊड स्पीकरला रात्री दहा ते सकाळी  सात बंदी राहील , बातम्यांमध्ये समतोल असावा , जातीय वैयक्तिक टीकाटिपणी बातमी रूपात करू नये ,  राजकीय दृष्ट्या 661 बॅनर फलक झाकले आहेत ,  राजकीय लोकांनी कोणतेही गोष्टीची पूर्व परवानगी घ्यावी ,  लोकसभा उमेदवारांची 95 लाख खर्च मर्यादा आहे .

  गतवर्षी मळे कदमवाडी , मोरगिरी संवेदनशील मतदार केंद्र होती .तालुक्यात आठ मतदार केंद्र वरती नेटवर्क अडचणी आहे . 409 मतदान केंद्र आहेत .306 एक गाव केंद्र , 36 दोन केंद्र असलेली ठिकाण 6 केंद्र 3 ठिकाणी तर 4 केंद्र असलेले पाटण आहे बँकांना सूचना दिल्या आहेत निवडणूक काळात बँकेतून पैसे काढल्यानंतर त्या पैशांवरती क्यू आर कोड असणार आहे असे सांगितले .

 यानंतर अतिरिक्त सहाय्यक अधिकारी तहसीलदार अनंत गुरव यांनी भारत निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणूक जाहीर केली लोकशाही जिवंत राहण्यासाठी निवडणूक एक पर्व आहे चुनाव का प्रवासी संबोधले जात आहे .

तालुक्यात चार भरारी पथक नेमली आहेत ऑनलाईनचे काम सुरू आहे निवडणूक संबंधित असणाऱ्या गाड्यांना जीपीआरएस बसवण्यात आले आहे 12 एप्रिल पासून स्थिर निरीक्षक पथक हेळवाक, निसरे ,तारळे, तळमावळे येथे सुरू होतील व्हिडिओ सर्वे होणार आहे लोकांना आचारसंहिता माहिती आहे काय करावे काय करू नये याची माहिती प्रत्येक व्यक्तीला असणे गरजेचे आहे तालुक्यात 409 मतदान केंद्र आहेत सुपने मंडळात काही मतदान केंद्र आहेत महिला आदर्श मतदान केंद्र पाटण विहे या ठिकाणी केले आहे युवा मतदान केंद्र पाटण कवठेकरवाडी या ठिकाणी केले आहे आदर्श (ऐतिहासिक )मतदान केंद्र चाफळ येथे दिव्यांग मतदान केंद्र कोंजवडे या ठिकाणी भटके विमुक्त साठी मतदान केंद्र तारळे येथे तर पडदांनशील मतदान केंद्र काढोली या ठिकाणी केले आहे मतदारसंघात 48 जून तयार केले आहेत पाच मतदार केंद्र साठी सेक्टर ऑफिसर असणार आहेत तालुक्यातील मतदार वाढवण्यासाठी जनजागृती कार्यक्रम तयार केला आहे सायकल रॅली प्रभात फेरी महिला संवाद मेळावा 9 मतदार मेळावा रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करणार आहोत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे बी एल ओ 409 केंद्रांवर नेमलेले आहेत 85 वर्षावरील लोकांसाठी 12 d चा अर्ज भरून पोस्टल मतदान करण्याची सोय केली आहे मंगळवार पर्यंत खाजगी मालमत्तेवरील झेंडे बॅनर काढावेत 409 केंद्रांवरील अधिकारी लोकांचे प्रशिक्षण होणार आहेत लोकांना मतदान प्रशिक्षण देण्यात येणार आहे अशी माहिती दिली.आहे